Loan for Ladki Bahin Yojana – To further strengthen the economic empowerment of women, it has been decided to link the ‘Ladki Bahin’ scheme with other government schemes. Chief Minister Devendra Fadnavis announced that through this, loans will be made available to women for various businesses and activities. When reviewing the various schemes and grants implemented by the state government, it is seen that the repayment rate in general loan schemes is about 50 percent. However, the repayment rate of loans given to women through self-help groups or other channels is more than 99 percent. Therefore, it is clear that women have the potential to build a capable economy by using loans properly under Loan for Ladki Bahin.

आताच लाडकी बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय व उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व अनुदानाचा आढावा घेतला असता, सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेड करणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याचे दिसून येते. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण ९९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महिलांमध्ये कर्जाचा योग्य वापर करून सक्षम अर्थकारण उभारण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट होते. अजून पुढील माहिती आम्ही खाली देतो आहोत.
या पार्श्वभूमीवर महिलांना केवळ ‘लाडकी बहीण’योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यापेक्षा त्या योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना कोणताही जामीन किंवा हमी न देता विविध उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी उपयोगात आणली जाणार आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे महिलांना विविध क्षेत्रांत व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळेल. शासनाच्या ‘ उमेद’ या उपक्रमामार्फत या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’मध्ये महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे महिला उद्योग-व्यवसायात मोठ्या खाजगी संस्थांनाही स्पर्धा देतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
The post संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत 188 रिक्त पदांकरिता भरती; | DRDO Bharti 2026 appeared first on https://maharashtrajobsalert.in.

AviatorSportybet… Hmm, intriguing! Especially if you’re into Aviator! Looks like it’s worth a shot! Let’s check it out at aviatorsportybet